Breaking News

महाडमध्ये भाजपकडून निषेध

महाड : प्रतिनिधी

भारत बंदला महाडमधील व्यापार्‍यांनी पाठिंबा दिला नसुन बहुतांश बाजारपेठ सुरळीत सुरू होती. मात्र प्रशासकिय यंत्रणेचा वापर करुन पोलीस बळावर महाड बंद करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाड भाजपने हाणून पाडला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विधीमंडळात सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले.

भारत बंदचा महाडमध्ये फज्जा झाल्याचे दिसून आले असून, मिनीडोअर आणि एसटीच्या ग्रामीण फेर्‍या वगळता महाडमधील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. व्यापार्‍यांनी जरी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला असला तरी दुकाने बंद करण्यास नकार दिला. त्यामुळे बहुतांशी बाजारपेठ सुरू होती, मात्र आघाडी सरकारने प्रशासकिय यंत्रणेचा वापर करत बंद यशस्वी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या मध्ये कारण नसताना एसटीच्या ग्रामीण फेर्‍या बंद ठेवण्यात आल्या होत्या. जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात येत होती. याला भाजप महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी विरोध केला तेव्हा हा आदेश पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी दिल्याचे समजले.

या प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गंभीर दखल घेत सरकार जाब विचारणार असल्याचे सांगितले. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये समन्वय नसल्याचे दिसले. लॉकडाऊनमध्ये पिचलेला व्यापारी या बंदमध्ये सहभागी होत नाही हे दिसताच या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply