Breaking News

पनवेल मनपा स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 9) आयोजित करण्यात आली होती. ही सभा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.पनवेल महापालिकेची स्थायी समिती सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत महापालिकेमार्फत 2020-21 व 2021-22 या कालावधीकरिता महापालिकेमार्फत करण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमांची जनजागृती करणेकामी बॅनर छपाई करणे, ज्ञानेश्वर रामचंद्र आलदार उपशिक्षक यांच्या अपील अर्जाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे, महापालिकेमधील नियमित स्थायी आस्थपनेवरील कर्मचार्‍यांप्रमाणे समाविष्ट 23 ग्रामपंचायतींमधील महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 कलम 493नुसार संक्रमण कालावधीत कार्यरत कर्मचार्‍यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीचे रक्कम मंजूर करणे, तसेच नियमित खर्चाची व विकासकामांची देयक अदा करण्यासाठी मुदत ठेवी मुदतपूर्व वटविणे यांसारख्या विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या सभेला महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक अजय बहिरा, मुकीद काझी, उपायुक्त संंजय शिंदे, विठ्ठल ढाके आदी उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply