Breaking News

‘इनरव्हील’कडून निराधार वृद्धांना मदत

पनवेल : वार्ताहर

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन संस्थेने नुकतीच शांतीवन येथील आधारघर, शांतीवन वृद्धाश्रम आणि कुष्ठरोग निवारण समिती यांना भेट देऊन तेथील निराधार वृद्धांसाठी फराळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डायपर्स भेट दिले. येथील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावरील हास्य पाहून इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्ष ध्वनी तन्ना यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी क्लबच्या सदस्य हेतल बालड, मौसमी गोगुला, वैशाली कटारिया, दृष्टी बालड आदी उपस्थित होत्या.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply