Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

पनवेल ः वार्ताहर

लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याची घटना खारघर वसाहतीत घडली. खारघर परिसरातील एक महिलेने मागील 10 वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा तक्रार अर्ज वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे दिला आहे.

महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता त्यात तथ्य आढळले. त्यानुसार खारघर पोलीस स्टेशनमध्ये भा. दं. वि. 376 (2) (छ), 406, 313, 323, 504, 506प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी महिला खारघर परिसरातील महिलांना योगा शिकवत असे. तिची रोहित अवनी सिंग (35) पटेल पॅराडाइज खारघर याच्याशी ओळख झाली. पुढे त्याचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून सदर महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, तसेच महिलेला धमकावून तिच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply