Breaking News

‘त्या’ चाहत्याला द्यावे लागले स्पष्टीकरण

मेलबर्न : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेले भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवले. एका चाहत्याने या चौघांचे बिल भरून टाकले. या प्रकारानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याला पैसे घेण्याचा आग्रह केला, पण चाहत्याने पैसे न घेता केवळ सेल्फी क्लिक करवून घेतला. ही सारी कहाणी चाहत्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली होती, पण या कहाणीतूनच त्याच्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ ओढवली.
चाहता नवलदीप सिंग या खेळाडूंच्या जवळच्या टेबलवरच बसला होता. त्याने भारतीय क्रिकेटपटूंना पाहिले तेव्हा त्याला फार आनंद झाला. नवलदीपने या खेळाडूंचे सहा हजार 683 रुपयांचे बिल भरून टाकलं. त्यानंतर केलेल्या अनेक ट्विट्सपैकी एका ट्विटमध्ये त्या चाहत्याला ऋषभ पंतने मिठी मारली, असे नमूद करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटूंना कोणालाही मिठी न मारण्याचे नियम घालून दिले आहेत. अशा स्थितीत त्याने असे कसे केले याबद्दल चर्चा सुरू झाली होती व पंत अडचणीत सापडणार अशी शंका होती, परंतु नवलदीप सिंगने पुन्हा एक ट्विट करीत या प्रकाराबाबत स्पष्टीकरण दिले. पंतने मला मिठी मारलेली नाही. मी अतिशय आनंदी झालो होतो. त्यामुळे उत्साहाच्या भरात मी तसे लिहिले होते, मात्र तसे काहीही घडले नाही, असे स्पष्टीकरण चाहत्याने दिले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply