पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांचा शुभारंभ गुरुवारी (दि. 10) सलग दुसर्या दिवशी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत गुरुवारी आपटा पिंपळ आळी येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, चावणे जलशुद्धीकरण केंद्र ते लाडिवली पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन टाकणे आणि जाताडे येथे अंतर्गत रस्ता तयार करणे या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या सोहळ्यास पनवेल पंचायत समिती सदस्य तनुजा टेंबे, भाजप तालुका उपाध्यक्ष अॅड संजय टेंबे, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र बांडे, शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ अविनाश गाताडे, पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, युवा मोर्चा अध्यक्ष अशोक मालुसरे, उपसरपंच शांताराम मालुसरे, सदस्य मनोज पवार, प्रभावती कार्लेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण गोडिवले, उद्योजक वासुदेव मांडवकर, वसंत गोळे, ज्ञानेश्वर मुंढे, प्रकाश शेडगे, रोहिदास टोंडे, संतोष म्हात्रे, मच्छिंद्र पाटील, सतीश पाटील, श्रीपाद भोईर, जनार्दन पाटील, एकनाथ पाटील, भावेंद्र म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, मंगेश म्हात्रे, मोहन म्हसकर, रवी पाटील, वैभव टोंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी अरुणशेठ भगत आणि डॉ. अविनाश गाताडे यांनी मनोगत व्यक्त केले.
Check Also
पनवेलच्या श्लोकची आंतरराष्ट्रीय भरारी!
‘३:३०’ लघुपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवड; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा पनवेल : …
RamPrahar – The Panvel Daily Paper