पनवेल ः वार्ताहर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी (दि. 2) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
भारतीय जनता पक्षाने केलेली विकासकामे आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांचे पदाधिकारी कमळ हाती घेत आहेत. त्याअंतर्गत दिनेश रसाळ यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादीचे रमेश भागारसाळ, राजेंद्र रसाळ, रवींद्र गेलारे, विलास रसाळ, अनिल रसाळ, मिलिंद रसाळ, शांताराम गोमारे, काळूराम रसाळ यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
