पनवेल ः वार्ताहर
मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज पनवेल परिसरातील ग्रामीण भागात प्रचारासाठी आले असताना अबोली रिक्षा महिला संघटनांनी त्यांची भेट घेवून त्यांच्या समोर त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी खा.श्रीरंग बारणे यांची अबोली महिला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संतोष भगत, सचिव विलास मोरे, उपाध्यक्षा शालिनी गुरव, खजिनदार ललित राऊत, सदस्या सुनिता जाधव, मनिषा देशमुख, कल्पना सरडे, आशा घालमे, आशा तागड, अश्विनी शितोळे, अनिता पाटील, वर्षा रासगुडे, वृषाली रोडगे, सिमा नरवडे, सुनिता पवार, अश्विनी तसेच पनवेल शहर शिवसेना संघटक प्रवीण जाधव आदींनी त्यांची भेट घेवून अबोली रिक्षांसाठी विशेषतः महिला रिक्षा चालकांसाठी पनवेल शहरात कायमस्वरुपी थांबे देण्यात यावेत यासाठी खा.श्रीरंग बारणे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली. यावेळी खा.श्रीरंग बारणे यांनी संबंधित वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व पनवेल महानगरपालिका यांच्याशी बोलून योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन दिले.