Breaking News

महिला वर्गासाठी प्रशिक्षण कार्यशाळा

पनवेल : बातमीदार

आम्ही उद्योगिनी नवी मुंबई शाखा व नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या माध्यमातून महिलांना विनामूल्य डेनिम ज्वेलरी व अ‍ॅक्सेसरीज प्रशिक्षण देण्यात आले. शुक्रवारी (दि. 22) दुपारी 2 ते 5 वा.  सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र, समाज मंदिर, सेक्टर 5 ई मध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. या वेळी हॅन्डीक्राफ्ट ज्वेलरी डिझायनर राजश्री साळुंके या महिलांना मार्गदर्शन करतील. याशिवाय डेनिमचे दागिने व अ‍ॅक्सेसरीज बनविण्याचा व्यवसाय घरच्या घरी कसा करावा, कॉर्पोरेट गिफ्टचे आकर्षक पॅकिंग व प्रेझेन्टेशन कसे कराल यासंबंधी टीप्स दिल्या जातील. नाव नोंदणीसाठी 9029014982 येथे संपर्क साधावा.

Check Also

संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …

Leave a Reply