अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये 28 हजार 621 आणि निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 371 असे एकूण 39 हजार 992 हेक्टरवरील कोरडवाहू शेतीचे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 281 हेक्टर फळ बागायतींना हानी पोहचून जिल्ह्यातील 84 हजार 344 शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 44 हजार 684 लाभार्थ्यांना अजून शासकीय मदत मिळालेली नाही.
रायगड जिल्ह्यात साधारण एक लाख 10 हजार हेक्टर भाताचे क्षेत्र आहे. कोविड, निसर्ग चक्रीवादळ यामुळे शेतीच्या कामाला उशिरा सुरुवात झाली होती. अशाही परिस्थितीत खचून न जाता शेतकरी कामाला लागला. शेतीला पूरक पाऊस पडल्यामुळे भात रोपांची चांगली वाढ झाली. पीक परिस्थिती चांगली असल्यामुळे शेतकरी आनंदात होता, मात्र ऑक्टोबर महिन्यात तीन दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतामध्ये भात पीक झोपले आणि शेतकर्यांचे नुकसान झाले. त्यानंतर जे काही मिळाले त्याची शेतकर्यांनी मळणी केली, मात्र मागील चार दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे उडव्यामध्ये पाणी शिरून नुकसान झाले. भात भिजल्यामुळे तो लाल होऊन त्याची कणी होते. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार आहे.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …