Breaking News

खांदा कॉलनी भाजप महिला मोर्चातर्फे खाऊवाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त  गुरुवारी (दि. 2) खांदा कॉलनी भाजप महिला मोर्चा यांच्यातर्फे सुकर्मा चॅरिटेबल ट्रस्टमधील मुलांना मोफत खाऊवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष राखी पिंपळे यांच्या नेतृत्वखाली करण्यात आले.

कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर महिला मोर्चा सरचिटणीस नीता माळी, शहर चिटणीस मनीषा चिल्ले, शहर भ. वि. आ. अध्यक्ष गोपीनाथ मुंडे, प्रेमा भोपी, खांदा कॉलनी महिला मोर्चा उपाध्यक्षा सानिका इंदुलकर, मनीषा पाटील सरचिटणीस आशा मुंडे, सचिव संध्या जाधव, सभासद सोनाली भाऊसाहेब सावंत, सीमा निकम, विनोदा शेट्टी, रीमा ताई उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply