नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी
कळंबोली : प्रतिनिधी
केंद्र तसेच राज्य सरकारने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली सार्वजनिक ठिकाणे खुली केली आहेत. त्यानुसार खारघर शहरातील जागतिक पातळीवर ओळख असेलले सेंट्रल पार्क मैदानदेखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.
खारघर शहरातील नागरिक, महिला, मुले व तरुण खेळाडू हे लोकप्रतिनिधी या नात्याने नगरसेवक म्हणून खारघरमधील सेंट्रल पार्क महापालिकेच्या ताब्यातील सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली करण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. सेंट्रल पार्क हे जगातील सर्वात मोठे पार्क असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे. त्यामुळे या पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात जागा ही नागरिकांना फिरण्यासाठी, चालण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणीदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी सामाजिक अंतरदेखील राखता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी सर्व सामान्य नागरिकांची मागणी लक्षात घेता खारघर येथील सेंट्रल पार्क तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीतील खेळाची मैदाने, उद्याने खुली करावीत जेणेकरून खेळाडू व ज्येष्ठ नागरिकांना तिथे जाता येईल व आनंद घेता येईल.