Breaking News

मोहोपाड्यातील सीसीटीव्ही पूर्ववत; ‘रामप्रहर’च्या वृत्ताची दखल

मोहोपाडा : प्रतिनिधी

दैनिक रामप्रहरमध्ये सोमवार (दि.14)च्या अंकात मोहोपाड्यातील सीसीटीव्ही दुर्लक्ष या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

याअगोदर प्रस्तुत प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते यावर चर्चा केली होती. ‘रामप्रहर’मध्ये वृत्त प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेत वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायतीने माजी सरपंच संदीप मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच सीसीटिव्ही कॅमेरे मागवून मंगळवारी (दि.15) रात्री काम सुरू केले.

रसायनी परीसराची मुख्य बाजारपेठ असलेला मोहोपाडा व नविन पोसरी परीसर सिसीटीव्हीच्या नजरकैदेत राहणार असून परीसरात घडणार्‍या लहानलहान चोरांना वचक बसणार आहे. मोहोपाडा मुख्य बाजारपेठ, गुरुकृपा स्टोअर्स समोर, श्री दत्त मंदिर मोहोपाडा बाजारपेठ परीसर, प्रबोधनकार ठाकरे चौकात सिसीटीव्ही बसविण्यात आले. तसेच आली आंबिवली नाना करवले मार्गांकडे जाणारा रस्ता, मोहोपाडा श्री गणेश मंदिर, ग्रामपंचायत परीसरात सिसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. याचा सीसीटीव्ही कंट्रोल संच वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायतीत असणार आहे. तसेच नवीन पोसरी कमानी, नवीन पोसरी गावदेवी मंदिर, खारकर आळी येथे सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू असून त्यांचा कंट्रोल संच नवीन पोसरी गावदेवी मंदिरात लावण्यात येणार आहे. दै. रामप्रहरने बातमी देताच वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायतीच्या वतीने दुसर्‍याच दिवशी सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू करण्यात आल्याने दै. रामप्रहरचे कौतुक होत आहे.

लवकरच रसायनी परीसरातील मुख्य थांबेही सीसीटीव्हीत कैद होतील, असे आश्वासन वावेघर, चांभार्ली ग्रामपंचायतीनेही दिले आहे. सन 2021 जानेवारी संपुर्ण रसायनी सिसीटीव्ही नजरकैदेत असल्याने रसायनी पोलिसांनाही गुन्हेगारांचा तपास करणे सोयिस्कर होईल. सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा काही महिने खोळंबलेला विषय मार्गी लागल्याने नागरिक आभार व्यक्त करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply