Breaking News

105 वर्षांच्या आजीबाईंनी केली कोरोनावर मात

पुणे ः प्रतिनिधी
संपूर्ण जगाला जेरीस आणणार्‍या महाभयंकर कोरोनाची अनेकांना लागण झाली, तर काहींचा बळीही गेला. कोरोनाविरुद्धची लढाई अनेकांनी जिंकलीदेखील. अशाच प्रकारे आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंजवडीतील 105 वर्षांच्या आजीबाईंनी प्रबळ इच्छाशक्ती व उपचाराच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. शांताबाई हुलावळे असे या आजीबाईंचे नाव.
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात महिनाभरापूर्वीपर्यंत अनेक खासगी व सरकारी कोविड रुग्णालये कार्यरत होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे त्यातली अनेक रुग्णालये कोरोनाबाधितांना भरती करून घेत नाहीत. त्यामुळे हुलावळे परिवारासमोर आजीबाईंच्या उपचाराचा मोठा प्रश्न होता. अखेर वाकड व हिंजवडी परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये या आजींवर उपचार करण्यात आल्याचे त्यांचे नातू संदीप हुलावळे यांनी सांगितले.
सुनियोजित उपचारांमुळे अगदी काही दिवसांतच कोरोना आजारावर यशस्वी मात करून आजीबाई एकदम ठणठणीत बर्‍या होऊन घरी परतल्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply