Breaking News

मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू

मुंबई ः प्रतिनिधी
गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या लोकलचे दार बंदच आहे, पण आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गारेगार दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेमार्गावर एसी लोकल सुरू झाली आहे.
मुंबईतील लोकल रेल्वेचा प्रवास हा घामाघूम करणारा असतो. जीवघेणी गर्दी आणि घामांच्या धारांमुळे हा प्रवास मुंबईकरांना आतापर्यंत त्रासदायक ठरलाय. हा प्रवास थोडासा सुखद व्हावा यासाठी आता एसी लोकल्स सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर अशा लोकल्स आधीच सुरू झाल्या आहेत. प्रतीक्षा होती ती मध्य रेल्वेची. आता येणारा उन्हाळा मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांसाठी सुखद ठरणार आहे.
कुर्ला रेल्वेस्थानकावरून गुरुवारी (दि. 17) पहाटे 5.42 वाजता पहिली एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना झाली. कल्याण ते सीएसटीएम स्थानकादरम्यान 10 एसी लोकल चालवण्यात येणार आहेत.
सीएसएमटी ते कल्याण मार्गावर एसी लोकल सेवा ही सोमवार ते शनिवार सुरू राहणार आहे. एसी लोकल धीम्या मार्गाने धावेल. त्यामुळे ती सर्वच स्थानकांवर थांबणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे अत्यावश्यक सेवा म्हणून लोकलने प्रवास करण्यास मुभा आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे परवानगी असेल असा प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करता येणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply