रायसेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील रायसेन येथील शेतकरी संमेलनाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पुन्हा एकदा सुधारित कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले आहे. कृषी कायदे हे एका रात्रीत आलेले नाहीत, तर गेल्या 20 ते 22 वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने त्यावर व्यापक चर्चा केलेली आहे. आज देशातील सर्वच राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे बघितले, त्यांची जुनी भाषणे ऐकली, जे कृषी मंत्रालय सांभाळत होते त्यांची पत्रे वाचली तर आज कृषी क्षेत्रात जे बदल करण्यात आले आहेत ते वेगळे नाहीत. आमचे सरकार शेतकरी समर्पित असून, आम्ही फायलींच्या ढिगार्यात फेकण्यात आलेल्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि शिफारशी लागू केल्या, पण आज मोदी हे सगळे लागू करीत असल्याने विरोधकांना पोटदुखी होतेय, असा निशाणा पंतप्रधानांनी साधला.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …