Breaking News

नवीन पनवेलच्या पाणीप्रश्नी नागरिकांची बैठक

सिडकोकडे पाठपुरावा करणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोच्या चालढकल कारभारामुळे नवीन पनवेल वसाहतीमधील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल सुरू असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पाणीप्रश्नासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची बैठक रविवारी (दि. 3) खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत लवकरात लवकर या संदर्भात सिडकोकडे पाठपुरावा करून पाण्याची समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सिडको वसाहतीमधील नवीन पनवेल सेक्टर 1,1एस, 2, 3, 4, 9, 10, 11 तसेच अन्य ठिकाणी पाण्याच्या समस्येमुळे रहिवासी चिंताग्रस्त  आहेत. आंदोलने करूनही सिडको पाण्याचा प्रश्न सोडवत नसल्यामुळे लोक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमेवत नागरिकांची बैठक झाली.
या बैठकीस माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, भाजप महिला मोर्चाच्या शोभा सातपुते, कुलबीर सिंग चंडोक, यमुना प्रकाशन, श्री. बांदेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर पाण्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply