उसर्ली बुद्रुक, उमरोलीतील कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाच्या मतलबी कारभाराला कंटाळून पनवेल तालुक्यातील उसर्ली बुद्रुक व उमरोली येथील असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 21) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवागतांचे स्वागत केले.
भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम पोपेटा, पांडुरंग पाटील, विश्वजित पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भाजप हा देशाचा व प्रत्येक नागरिकाच्या विकासाचा विचार करणारा पक्ष आहे. सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास या संकल्पनेतून भाजप काम करीत आहे. म्हणूनच देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात भाजप मजबूत होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केलेली कामे देशाला प्रगतिपथावर नेणारी आहेत. खेडोपाडी, तळागाळात विविध योजना राबवून प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचे काम ते करीत आहेत.
महिलांचा विचार करून उज्ज्वला गॅस योजना, शौचालये, आरोग्य योजना, पोषण आहार, लसीकरण, जनधन खात्यात अर्थसहाय्य अशा अनेक योजना राबवत महिलांचा विकास केला जात आहे. कृषी कायदे व सन्मान योजनेतून शेतकर्याला सन्मान व बळ दिले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, कर्नाळा बँक घोटाळ्याने सर्वसामान्यांचे पैसे अडकविले आणि हे पैसे आपण स्वतः घेतल्याचे बँकेचे अध्यक्ष शेकाप नेते विवेक पाटील यांनी खुलेपणाने जाहीर केले आहे. तरीदेखील विवेक पाटील ठेवीदारांचे पैसे देण्यास अद्यापही टाळाटाळ करीत असून, सर्वसामान्यांचे पैसे बुडाले तरी चालतील, पण आपल्या पुढच्या पिढीला पैसा पुरला पाहिजे म्हणून गब्बर मालमत्ता असतानाही विवेक पाटील ठेवीदारांचे पैसे परत करीत नाहीत.
ह्यांनी केला पक्षप्रवेश
शेकाप पुढार्यांच्या स्वार्थी व ढोंगीपणाला कंटाळून उसर्ली बुद्रुक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दशरथ डांगरकर, लक्ष्मण लबडे, ज्ञानेश्वर डांगरकर, धर्मा डांगरकर, उदय डांगरकर, संतोष पाटील, हनुमान डांगरकर, बाळू बडेकर, रेश्मा दीपक पाटील, भगवान पाटील, गुलाब डांगरकर, बाळाराम रामभाऊ पाटील, जयदास डांगरकर, महादेव डांगरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रितेश डांगरकर, रामदास डांगरकर, पंकेश डांगरकर, धनराज डांगरकर, नामदेव डांगरकर, कृष्णा डांगरकर, किरण डांगरकर, संदीप डांगरकर, गणू डांगरकर, संजय डांगरकर, सुगंध डांगरकर, किशोर डांगरकर, मुकेश डांगरकर, राम डांगरकर, श्याम डांगरकर, काशिनाथ पाटील, छगन पाटील, एकनाथ डांगरकर, अनंता डांगरकर, बाळाराम बळीराम पाटील, सुभाष बेडेकर, अजय डांगरकर, राज डांगरकर, रूपेश डांगरकर, नितेश पाटील, हनुमान बोलाडे, मनोज पाटील, राकेश डांगरकर, प्रवीण पाटील, सचिन पाटील, सुनील पाटील, नरेश बडेकर, कैलाश डांगरकर, सुधीर मालुसरे, मंगेश पाटील, संतोष म्हात्रे तसेच उमरोली येथील माजी ग्रामपंचायत सदस्य बळीराम मढवी, संजय मढवी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासपुरुष -आमदार प्रशांत ठाकूर
पूर्वीच्या काळी योजनांचा एक रुपया जनतेकडे पोहचेपर्यंत त्याचे पंचवीस पैसे व्हायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे कटाक्षाने लक्ष दिल्याने आता योजनेचा संपूर्ण लाभ लाभार्थ्यांच्या थेट बँकेत जमा केला जात आहे. प्रत्येक वर्गासाठी त्यांनी योजना राबविल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासपुरुष आहेत. त्यामुळे प्रत्येक घटकातील व्यक्तींची त्यांना पसंती आहे. भाजप म्हणून काम करीत असताना सर्वांचा विश्वास पक्षावर दिवसेंदिवस वाढत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी नमूद केले.