Breaking News

रिसवाडीत श्रमदानातून बांधले घर

मोहोपाडा : प्रतिनिधी

आशियाना मोहिमेंतर्गत डॉ. गुरुमीत राम रहिम सिंह यांच्या डेरा सच्चा सौदा भक्तांकडून खालापूर तालुक्यातील रसायनी परिसरातील रिसवाडी येथील वयोवृद्ध लक्ष्मण दगडू पंदेकर यांना श्रमदानातून राहण्यासाठी घर बांधून देण्यात आले. गुरुमीत संत डॉ. राम रहिम सिंग जी इंसा यांच्या डेरा इंसा डेरा सच्चा सौदा शहा संत नामजी परमसुख आश्रम कलोते खालापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जी. ग्रीन. एस. वेलफर फोर्स विग यांच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात. संत परमसुख आश्रमाकडून रक्तदान शिबिर, निराधारांना घर, कोणत्याही ठिकाणी जीवितहानी झाल्यास नागरिकांचे रक्षण, गरिबांना अन्नदान, रेशनचे वाटप, गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके, शाळेच्या बॅग्ज असे विविध 134 समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. लक्ष्मण पंदेकर या वयोवृद्धाचे कुडाचे घर गेल्या वर्षी आलेल्या पावसात पडल्यामुळे पंदेकर कुटुंब निराधार झाले होते. याबाबत त्यांनी संत डॉ. गुरुमीत राम रहीम सिंग जी इंसा आश्रम कलोते, खालापूर येथे भक्तांना मदतीसाठी विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना घर बांधण्यास मदत करण्यात आली. महाराष्ट्रभरातून आलेल्या 45 भक्तांनी स्वतः धन धन सद्गुरू तेरा ही आसरा असा नामघोष करीत बांधकाम करून घराचे काम पूर्ण केले. याबद्दल त्यांचे लक्ष्मण पंदेकर यांनी आभार मानले. या वेळी गुरुदयाल इंसा, सुनील मोरे इंसा, विक्रम इंसा, अमोल इंसा, जनार्दन पाल इंसा, बंता सिंग, सुरजित इंसा, बालिया इंसा यांच्यासह महिला भक्त व मुलांनी श्रमदान करून घर पूर्ण केले. या समाजसेवी कामाबद्दल भक्तांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply