उरण ः वार्ताहर
उरणमधील जुगनू कोळी यांनी लिवी ओव्हरसिज स्टडी नावाने सुरू केलेल्या व्यावसायिक शिक्षण उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या मातोश्री बेबीताई कोळी व उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहणे म्हणून कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे संचालक धनंजय घुले उपस्थित होते. या वेळी चाणजे ग्रामपंचायत माजी सरपंच जितेंद्र घरत, सदस्य भालचंद्र म्हात्रे, मोहम्मद फारूक खान तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. जुगनू कोळी यांनी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. पुढील काळात येथून चांगले शिक्षण घेऊन विद्यार्थी सातसमुद्रा पलीकडे जातील. माझे या उपक्रमास कायम योगदान व सहकार्य मिळेल, असे आमदार महेश बालदी यांनी या वेळी सांगितले. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राज्यातील विविध जिल्ह्यांतील 27 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. 2020 साठी प्रवेश खुले आहेत. गरीब विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत दिली जाईल. उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक वर्ग, भरपूर प्रॅक्टिकल आणि माफक फी ही आमच्या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, असे व्यवस्थापकीय संचालक जुगनू कोळी यांनी सांगितले.