Breaking News

कोतवाल बुद्रुक येथील मंदिरांच्या जिर्णोध्दाराचा वर्धापनदिन उत्साहात

आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील ग्रामदैवता काळकाई, जननी कुंभळजय देवींच्या नूतन मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या वर्धापनदिन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी स्वराज्य सावित्री मिनरल वॉटर बॉटल्सचे दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पोलादपूर तालुक्यातील संदेश सकपाळ व महाड तालुक्यातील विलास सकपाळ यांच्या मिनरल वॉटर प्युअर बॉटल्सच्या स्वराज्य सावित्री या ब्रँडचे उद्घाटन  करताना आमदार प्रवीण दरेकर यांनी नवोदित उद्योजक सकपाळ बंधूंना शुभेच्छा दिल्या.

सोहळ्याला मुंबई भाजप उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, रामचंद्र महाराज शिंदे, सरपंच गणेश कदम, कृष्णकांत दरेकर, मुरलीधर दरेकर, सुभाष दरेकर, उपसरपंच शामली पार्टे, पोलीस पाटील श्रीधर जाधव, नवी मुंबई शाखाप्रमुख विजय कदम, परशुराम दरेकर, राजेश सकपाळ, राजाराम जाधव, श्रीकांत पार्टे, सचिन दरेकर, आशिष दरेकर, संजय पार्टे, विजय दरेकर, गिरिधर दरेकर आदी उपस्थित होते.

या वर्धापनदिनानिमित्त गावामध्ये मिरवणूक सोहळा, मुर्ती अभिषेक, श्रीसत्यनारायणाची महापूजा, महाआरती, महाप्रसाद, दीपोत्सव, हरीपाठ, करमणूकीचे कार्यक्रम या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply