Breaking News

‘डॉ. आंबेडकर संस्कार केंद्रातून अधिकारी घडतील’

खालापूर : प्रतिनिधी                 

प्रत्येक गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार  केंद्र उभारून तेथे वाचनालय सुरू केल्यास मुलांच्या बुध्दीचा विकास होईल, त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास भविष्यात आयपीएस, आयएएस आधिकारी घडतील, असा विश्वास पनवेलचे उपमहापौर तथा आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. खोपोली नगरपालिका हद्दीतील यशवंतनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 25) डिसेंबर या नियोजीत संस्कार केंद्राचे भूमिपूजन जगदिश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या संस्कार केंद्राचा उपयोग चांगल्या कामासाठी करण्याचे आवाहन गायकवाड यांनी या वेळी केले. यशवंतनगर झोपडपट्टीमुक्त करून रहिवाशांच्या नावे सातबारा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जगदिश गायकवाड यांनी दिली. जिल्हा नियोजन मंडाळाने या संस्कार केंद्रासाठी 53 लाख, गटारे व रस्त्यासाठी 26 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती युवा नेते प्रमोद महाडिक यांनी दिली. जि.प.च्या माजी अध्यक्षा कविता गायकवाड, खोपोलीच्या नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता कांबळी, नगरसेवक किशोर पानसरे, सुनील पाटील, नगरसेविका वनिता काळे, माजी नगरसेवक आनंद नायडू, संजय पाटील, मुख्याधिकारी गणेश शेटे, पनवेलच्या नगरसेविका विद्या गायकवाड तसेच नरेंद्र गायकवाड, धर्मानंद गायकवाड, नंदुशेठ ओसवाल, उच्चाप्पा वरचाली, अरूण सदाफले, चिंतामण सोनावणे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply