Breaking News

दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची गर्दी

उरण ः वार्ताहर – उरणमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असतानाच तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी  आवश्यक कागदपत्रांसाठी उरण तहसील कार्यालयात गर्दी केली होती. तहसील कार्यालय सेतू केंद्रावर दाखले काढण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडत आहे.

सकाळपासूनच उमेदवार व त्यांचे सहकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. उरण तालुक्यातील चणजे, नागाव, केगाव, म्हातवली, फुंडे आणि वेश्वी या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परिणामी इच्छुक उमेदवारांच्या गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणेवर अचानक ताण आला आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply