माणगाव : प्रतिनिधी
माणगाव येथे तीनबत्ती नाका मैदानावर आय्यान क्रिकेट क्लबतर्फे आय्यान चषकाचे आयोजन दि. 29, 30 व 31 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. स्पर्धेत यजमान आय्यान क्रिकेट क्लब माणगाव व रॉयल क्रिकेट क्लब बोर्ली संघात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात यजमान आय्यान क्रिकेट क्लब माणगाव संघाने बाजी मारून प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक 25000 रुपये व आकर्षक चषक पटकावला. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 नामवंत संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील उपविजेते रॉयल क्रिकेट क्लब बोर्ली संघाला रोख 15000 रुपये व आकर्षक चषक, तृतीय फ्रेंड्स ग्रुप साई संघास रोख 7000 रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ विजेते एमसीए तळा संघास रोख 4000 रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकांत उत्कृष्ट फलंदाज रॉयल संघाचा आक्रमक फलंदाज माजीद बरडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून यजमान आय्यान क्रिकेट क्लबचा द्रुतगती गोलंदाज रीहान परदेशी, सामनावीर म्हणून आय्यानचा आक्रमक फलंदाज आदिल गजगे, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिल्या जाणार्या मालिकावीर बहुमानासाठी आय्यानचा अष्टपैलू खेळाडू मोहसीन नदाफची निवड करण्यात आली.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …