खारघर : रामप्रहर वृत्त भाजपा खारघर वॉर्ड क्र. 4च्या सरचिटणीस, संकल्प प्रतिष्ठान, खारघरच्या महिला अध्यक्षा अंकिता वारंग यांचा वाढदिवस वॉर्ड क्र. 4चे नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने प्रदूषणमुक्त फॅन्सी कापडी बॅग देऊन पर्यावरणपूरक बॅगेचा वापर करण्याचा संदेश देण्यात आला. संकल्प प्रतिष्ठान, खारघरतर्फे अशा बॅगांचे वितरण थोड्याच अवधीत खारघरमध्ये करण्याचे आश्वासन संस्थापक अध्यक्ष मांजरेकर यांनी दिले. याप्रसंगी खारघर भाजपा अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, सरचिटणीस गीता चौधरी, मोना अडवाणी, युवा चिटणीस व संकल्प प्रतिष्ठानचे सचिव अजय माळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
