सिडनी : वृत्तसंस्था
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी)वर खेळला जाणार आहे, मात्र या तिसर्या सामन्यावर कोरोनामुळे संकट आले आहे. एका रिपोर्टनुसार तिसरी कसोटी एससीजीवर प्रेक्षकांविना खेळली जाऊ शकते. ब्ल्यू माऊंटेन, इलावारा या भागात कोविडचा प्रसार अधिक आहे, तर एससीजीपासून 30 किलोमीटर अंतरावरील बेराला आणि स्मिथफील्ड अलर्टवर आहेत.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मास्क घालणे आता अनिवार्य करण्याच्या चर्चा आहेत तसेच 7 तारखेपासून खेळला जाणारा सामना प्रेक्षकांविना करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. मागील दोन आठवड्यांत सिडनीत कोरोना केसेस शून्यावरून 170वर पोहचल्या आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने ब्रॉडकास्टिंग स्टाफ कमी करण्याचादेखील निर्णय घेतला आहे.
पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभव झाल्यानंतर दुसर्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी केली आहे.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …