पनवेल ः रामप्रहर वृत्त
येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघात दि. 3 एप्रिल रोजी जुन्या जमान्यातील ब्लॅक अॅण्ड व्हाइट सिनेमातील प्रसिध्द गाणी इव्हीडी, डिव्हिडी
माध्यमाद्वारे सादर करण्यात आली. गीते गाणारे होते कर्जत येथील संजय नीलवर्ण़. ते स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. जी सिस्टीम त्यांनी तयार केली आहे, त्यामध्ये 800 गीतांचा संग्रह असून, त्यातील दीड तासामध्ये ट्रॅक रेकॉर्डेड पध्दतीने त्यांनी 26 ते 28 गीते सादर केली. ही गीते प्रामुख्याने दिलीपकुमार, देवानंद, राज कपूर, राजेश खन्ना, भारत भूषण, अमिताभ बच्चन या कलाकारांसोबतच नर्गिस, वैजयंती माला, नूतऩ, सायरा बानू आदी स्त्री कलाकार पडद्यावर पाहताना त्या काळातील आठवणी जाग्या झाल्या. काही द्वंद्वगीतेही सादर केली. मधुमती, अनाडी, यहुदी, मुनिमजी, चोरी चोरी, पैगाम, बैजू बावरा़, या सिनेमांतील ही गाणी होती. काही फर्माइश झालेली गाणीही सादर केली. मांग के साथ तुम्हारा, जिस देश मे गंगा बहती है, खोया खोया चांद, तू गंगा की मौज मै, याबरोबरच देशभक्तिपर है प्रीत जहा की रीत सदा, भारत का रहनेवाला हू, तसेच शेवटी नीलवर्ण यांचाही 60वा वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे गाणे गाऊन कार्यक्रम समाप्त झाला. अध्यक्ष नंदकुमार जोशी यांनी याप्रसंगी काही आठवणी सांगून गायकाचे आभार मानले.