Breaking News

चॅपल गुरुजींच्या संघात विराटची वर्णी; सचिन, द्रविडला स्थान नाही

मेलबर्न : वृत्तसंस्था

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांनी आपला सर्वकालीन कसोटीचा संघ जाहीर केला आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वर्तमानपत्राच्या एका लेखामध्ये चॅपल यांनी आपला सर्वोत्तम संघ निवडला आहे. चॅपल गुरुजींच्या संघात चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा भरणा आहे तसेच भारत आणि वेस्ट इंडिज या देशातील प्रत्येकी दोन-दोन खेळाडूंची निवड त्यांनी केली आहे, तर पाकिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. या संघात श्रीलंका, न्यूझीलंड आणि बांगलादेश या देशातील एकाही खेळाडूचा समावेश नाही. चॅपल यांच्या कसोटी संघात दोन भारतीय खेळाडूंची वर्णी लागली आहे. चॅपल यांनी आपल्या संघात सचिन, द्रविड, लक्ष्मण, कपिल देव, गावसकर, रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांच्यासारख्या दिग्गजांना स्थान दिले नाही, परंतु माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि सध्याचा डॅशिंग फलंदाज विराट कोहलीचा समावेश आहे. सचिन आणि द्रविडला वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असा आहे संघ : कोलिन मेलबर्न, वीरेंद्र सेहवाग, ग्रीमन पोलॉक, सर व्हिवियन रिचर्ड्स, विराट कोहली, सर गॅरीफील्ड सोबर्स, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, डेनिस लिली, वासिम जाफर, जेफ थॉमसन आणि शेन वॉर्न.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply