पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अंतर्गत किसान मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध मंडलाच्या अध्यक्षपदी पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 3) नियुक्तिपत्र देण्यात आले. पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, प्रदेश सचिव सुनील गोगटे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्यासह किसान मोर्चाचे अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कर्जत तालुका मंडल अध्यक्षपदी शिरीष कदम, खालापूर तालुका मंडल अध्यक्षपदी निलेश शिंदे, खोपोली शहर मंडल अध्यक्षपदी सुधाकर दळवी, उरण तालुका मंडल अध्यक्षपदी हरेश्वर म्हात्रे, पनवेल शहर मंडल अध्यक्षपदी रूपेश परदेशी, पनवेल ग्रामीण मंडल अध्यक्षपदी आत्माराम हातमोडे, कामोठे शहर मंडल अध्यक्षपदी संभाजी चिपळेकर, कळंबोली शहर मंडल अध्यक्षपदी रवींद्र पाटील, खारघर मंडल अध्यक्षपदी संतोष रेवणे, जिल्हा किसान मोर्चाच्या सरचिटणीपदी गोटीराम ढवळे, ताऊजी गावंड, उपाध्यक्षपदी पराग गायकवाड, गजानन दळवी, गणेश म्हात्रे, चिटणीस विनायक पवार, किसन शिनारे, रमेश पाटील, खजिनदारपदी गुरूनाथ भोईर, सदस्य म्हणून वसंत महाडिक, परशुराम आगिवले, मनोहर विशे, पमाबाई भस्मा, चंद्रकांत पाटील, बाळकृष्ण परदेशी, विकास पाटील, रामचंद्र जाधव, श्रीकांत नलावडे, शांताराम पाटील, उल्लास पाटील, कृष्णा पाटील, मंगेश गावंड, विजय म्हात्रे, रामचंद्र बांदल यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.