Breaking News

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळासाठी शासनाची मान्यता

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाकरिता कुशल व अकुशल मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणार्‍या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हे रुग्णालय लवकरच सेवेदाखल होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना, तसेच वाढत्या रस्ते अपघातांमधील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल येथे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व 20 खाटांचे ट्रॉमा केअर युनिटच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे. या रुग्णालयात आकृतीबंधानुसार एकूण 85 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये नियमित पदे, तसेच काल्पनिक कुशल व अकुशल पदांचा समावेश करण्यात आला आहे. याकरिता शासन निर्णयान्वये शैक्षणिक अर्हता व अनुभव आणि मासिक मानधन निश्चित करण्यात आले आहे. काल्पनिक कुशल व अकुशल असे एकूण 57 मनुष्यबळ कंत्राटी तत्त्वावर खाजगी पुरवठादारांकडून उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणार्‍या खर्चास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पनवेल येथील सार्वजनिक उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू होण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून या रुग्णालयाचे काम 25 जूनपूर्वी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 19 जूनला पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार प्रशांत ठाकूर, तसेच अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विधान भवनात आढावा बैठक झाली. त्या वेळी पदे भरण्याचा विनंती प्रस्ताव शासनाच्या आरोग्यविषयक धोरणानुसार तत्त्वतः मान्य करण्यात आला. त्याप्रमाणे 57 मनुष्यबळ पदनिर्मिती करण्याचे शासन आदेश 5 जुलैच्या शासन निर्णयात देण्यात आले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply