मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश नेतृत्व बदलाचे संकेत मिळत आहे. नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत बुधवारी (दि. 6) मुंबईत झालेल्या बैठकीत राज्य प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडून चाचपणी करण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जागी बिगर मराठा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत प्रभारी एच. के. पाटील यांनी मंगळवारी रात्री बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता काँग्रेसच्या मंत्र्यांशी चर्चा सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी हे पद सोडण्याबाबत प्रभारी पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा प्रस्ताव दिल्याने नव्या नेत्याच्या निवडीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत एच. के. पाटील चाचपणी करीत आहेत. पाटील यांच्यासह अशोक चव्हाण, अमित देशमुख, अस्लम शेख आणि विजय वड्डेटीवार यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात याबाबत चर्चा झाली. बाळासाहेब थोरात यांच्या जागी बिगर मराठा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. बिगर मराठा नेत्यांमध्ये राजीव सातव, नाना पटोले, विजय वड्डेटीवार, नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …