Breaking News

रायगडात ग्रामपंचायतींसाठी 205 केंद्रांवर होणार मतदान

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असताना जिल्हा प्रशासनानेही या निवडणुकीच्या मतदानाची तयारी केली आहे. रायगड जिल्ह्यातील 88 पैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींसाठी एकूण 205 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण दोन हजार 475 अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार 436 अर्ज वैध आणि 39 अर्ज अवैध ठरले, तर 848 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता एकूण एक हजार 588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे, तर मतमोजणी 18 जानेवारीला होऊन निकाल जाहीर केला जाईल.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply