Breaking News

सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

अनेक जण आपला वाढदिवस मोठ्या हौसेने, डामडौलाने साजरा करतात. राजकीय क्षेत्रातील मंडळींचा वाढदिवस म्हणजे भव्य-दिव्य सेलिब्रेशन असते, परंतु काही नेते आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करतात. कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर त्याचे उत्तम उदाहरण आहे.

सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराचे हे महाशिबिर 4 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. या महाशिबिराचे यंदाचे हे 12वे वर्ष असून, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply