दुबई : वृत्तसंस्था
भारताचा नॅशनल आर्म रेसलिंग चॅम्पियन राहुल पॅनिकरने जगातील सर्वांत मजबूत बॉडीबिल्डर लॅरी व्हिर्ल्सला पंजा लढवण्याच्या स्पर्धेत दमदार मात दिली. याबद्दल राहुलचे कौतुक होत असून, त्याचा व्हिडीओही व्हायरल झालाय.
राहुलने नुकतीच लॅरी व्हिर्ल्ससोबत आर्म रेसलिंग मॅच खेळली. इंडियन आर्म रेसलिंग फेडरेशनने सांगितले की, लॅरीसोबतचा हा सामना सोपा नव्हता. राहुल आधी दोन राऊंड हरला होता, पण पुढील राऊंडमध्ये राहुलने दमदार कामगिरी करीत सर्वांना हैराण केले आहे. ही मॅच दुबईमध्ये झाली होती. राहुलने स्वत: या मॅचचा व्हिडीओ शेअर केला आहे.
राहुलबाबत आणखी सांगायचे तर गेल्या 10 वर्षांत त्याने सहापेक्षा जास्त राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. राहुलला रेसलिंगचे धडे घरातूनच मिळाले. त्याचे वडील पीटी पॅनिकर हे पॉवरलिफ्टर होते. त्यांना ’पॉवर मॅन ऑफ इंडिया’ हा किताबही मिळाला होता, तर राहुलचे काका उन्नीक्रिष्नन हेसुद्धा वेटलिफ्टींग चॅम्पियन होते.