Breaking News

रायगड जिल्ह्यात 43 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी (दि. 16) नवे 43 रुग्ण आढळले असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 21, अलिबाग तालुक्यातील नऊ, उरण तालुक्यातील सात, पनवेल ग्रामीणमधील चार आणि कर्जत व पेण तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, तर मृत पावलेले रुग्ण पनवेल मनपा हद्दीतील एक व अलिबाग तालुक्यातील एक असे आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1896वर पोहोचला असून, मृतांची संख्या 84 झाली आहे.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply