Breaking News

शिवसेना जनसेवेसाठी तत्पर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

पनवेल ः वार्ताहर

शिवसेनेने कायमच समाजसेवेचा वसा घेतलेला असून शिवसेना शाखा या लोकांच्या मदतीला असतात. त्यामुळेच माताभगिनी अडचणीत सापडल्यावर प्रथम शिवसेना शाखेत धाव घेतात व या वेळी त्यांच्या मदतीला शिवसैनिक भावासारखा धावून जातो, असे प्रशंसोद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खारघर येथे गुरुवारी

(दि. 4) काढले. खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कळंबोली ट्रान्सपोर्ट विभागातर्फे, तसेच उत्तर भारतीयांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश करून भगवा ध्वज हाती घेतला. त्यांचे स्वागत कोकण संपर्क नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह उत्तर रायगड संपर्कप्रमुख दत्ता दळवी, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, राकेश गोवारी, खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर, महिला आघाडी उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, रेवती सकपाळ, नवी मुंबई शिवसेना नेते नामदेव भगत, कळंबोली उपशहरप्रमुख कृष्णा कदम, मंगेश रानवडे, पक्षप्रवेशासाठी प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका बजावणारे गिरीश धुमाळ आदींसह इतर पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या वेळी बोलताना सुभाष देसाई यांनी सांगितले की, शिवसेनेचा भगवा तुम्ही मोठ्या विश्वासाने हाती घेतला आहे. त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ दिला जाणार नाही. आपल्या प्रत्येक अडीअडचणी आणि समस्या शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच लवकरात लवकर सोडविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. या वेळी ट्रान्सपोर्ट विभागातर्फे अजय गोयल, मयंक गोयल, अरुण गोयल, भिमजी मुखरिया, सतीश शर्मा, लवदीप सिंग यांच्यासह मोठ्या संख्येने इतर बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

-प्रत्येकाला शिवसेना आपल्या कुटुंबातील एक वाटते. आज प्रवेश करणार्‍या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनासुद्धा शिवसेना आपली वाटेल व कायम आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. -सुभाष देसाई, उद्योगमंत्री

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply