पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेवकपदाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यांतून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. तसेच त्यांनी कोरोना महामारीच्या काळातही अनेकांना मदतीचा हात पुढे करीत सेवाकार्य बजावले. त्यांनी वर्षभरात केलेल्या या कार्याची माहिती नमूद असलेल्या ‘भरारी दृष्टीक्षेप 2020-21’ या कार्य अहवालाचे रविवारी
(दि. 10) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेवकपदाच्या वर्षापूर्तीनिमित्त रूचिता लोंढे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांचा ‘भरारी’ हा कार्य अहवाल प्रकाशित झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, अॅड. मनोज भुजबळ, नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, एकनाथ भोपी, गुरुनाथ लोंढे, नंदाजी ओझे, सुजाता ओझे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक राजू सोनी यांनी आपले मनोगत व्यक्त करून रूचिता लोंढे यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …