खारघर : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षिका ज्योत्सना भरडा यांना नुकतेच राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोणावळा याठिकाणी हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भरडा या दि. 1 एप्रिल 2020 पासून कोरोना ड्युटीमध्ये काम करून कोरोना बाधित क्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण केले. कोरोना पॉजिटीव पेशंटचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम त्यांनी केले आहे. आता पर्यंत त्यानीं 2000 कोरोना रूग्णांशी संवाद साधला आहे. रुग्णांशी मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती भाषेत सहजरित्या संवाद साधून रुग्णांची सर्व माहिती मिळविणे, त्याच्या मनातील भिती दूर करणे, त्याला योग्य ती उपचार सेवा पुरविण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधून देणे. त्या पेशंटच्या नातेवाइकाची कोविड टेस्ट करण्यासाठी मदत करणे अशी कामे त्यांनी कोरोना काळामध्ये केली आहेत. गेले तीन वर्षे पनवेल महानगरपालिकेतील शाळा क्र.2, 5, 6, 9, 10 आयएसवो मानांकित व्हाव्यात म्हणून भरडा प्रयत्शील होत्या. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ यांनी घेऊन ज्योत्सना उमेश भरडा यांना राज्य प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भरडा यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.