Breaking News

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला

मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड पर्यटनस्थळी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी, खोरा, दिघी आदी परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या अधिक असते. अशा वेळी 400 पर्यटकांनीच किल्ला पाहावा ही अट जाचक असून जलवाहतूक सोसायट्यांना ती मान्य नसल्याने बोट मालक-चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. परिणामी पर्यटकांना किल्ला न बघताच परतावे लागत होते. अखेर याची दखल घेत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी किल्ल्यावरील निर्बंध हटवून किल्ला सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  
दरम्यान, जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी सुरू करताना कोविडच्या नियमांची  अंमलबजावणी, सोशल डिस्टन्स तसेच मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. त्यानुसार ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे.  जंजिरा पर्यटक सहकारी जलवाहतूक सोसायटीचे चेरमन इस्माईल आदमने व व्यवस्थापक नाझ कादरी यांनी या निर्णयाबद्दल जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचे आभार मानले आहेत. 3 जानेवारीपासून जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे पर्यटकांना किल्ला पाहता येत नव्हता, परंतु आता जिल्हाधिकार्‍यांनी 400 संख्येचे निर्बंध हटवताच बोटचालकांनी किल्ल्यावरील वाहतूक सुरू केल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply