Breaking News

मनसे कार्यकर्ते, काँग्रेस पदाधिकार्‍याचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात येत असलेली विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे कळंबोली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी (दि. 12) भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशकर्त्यांचे प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार व प्रचार अभियान युवा प्रदेशाध्यक्ष प्रमोद कराड आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेल मार्केेट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास नगरसेविका रूचिता लोंढे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर, सरचिटणीस चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी मनसेचे कळंबोली विभाग अध्यक्ष नियाज खान, उपाध्यक्ष निलेश गौतम, सेक्टर 15, 16 अध्यक्ष अनिरुद्ध मोटे, वेद झिंगाड, कुलदीप मंडल, यश रोकडे, हुनेन खान, नवान शेख, सैफ अनसारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply