सुधागड : प्रतिनिधी
ठाण्यातील विटाव्यात राहणारी मूळची सुधागड तालुक्यातील वाघोशी गावची सुकन्या पॉवरलिफ्टर सुश्मिता सुनील देशमुख हिने केरळमधील अल्पुझा येथे झालेल्या सब ज्युनिअर-सिनिअर मास्टर क्लासिक पॉवर लिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपद जिंकले. यासोबतच तिने राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावावर केला.
कल्याणच्या कारभारी जिमची खेळाडू असलेल्या सुश्मिताने राष्ट्रीय स्पर्धेत सिनियर गटामध्ये 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले तसेच राष्ट्रीय विक्रमासह स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान म्हणजे स्ट्राँग वूमन ऑफ इंडिया हा किताबही पटकाविला.
या कामगिरीबद्दल जूनमध्ये होणार्या आशियाई स्पर्धेसाठी सुश्मिताची निवड झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने प्रशिक्षक विनायक कारभारी, वडील सुनील देशमुख व आई वंदना देशमुख दिले आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …