Breaking News

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

उरण : वार्ताहर

राजमाता जिजाऊ समिती आयोजित जिजाऊ जन्मोत्सव रथयात्रा 2021च्या माध्यमातून मंगळवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ, समाधीस्थळ पाचाड, रायगड येथे जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला होता. या वेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी राजमाता जिजाऊंची माहिती व जिजाऊ पराक्रम सांगून आलेल्या भगिनींना स्त्री शक्तीची खरी ओळख करून देण्यात आली.

या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ठाण्याचे तरुण उद्योजक डी. सी. पाटील, समितीचे अध्यक्ष सचिन सांवत देसाई, कोकण अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, उपाध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड ठाणे, कार्याध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष सावंत, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष भुषण शिसोदे, रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ मगर, संतोष कदम, समीर म्हात्रे, परमानंद जांभळे, भरत सरफरे, अशरफ पठाण जितेश पाटील, अजित सुतार, सचिन गायकवाड तसेच महाराणी ताराराणी ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकारी व कोकणातील सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्य उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात झाला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply