Breaking News

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर -पवार

मुंबई ः प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी केलेला खुलासा यामुळे राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर असून, पक्ष म्हणून विचार करावा लागेल, अशी भूमिका पवारांनी मांडली आहे. ‘धनंजय मुंडे यांनी मला सांगितलेली माहिती पक्षातील इतर सहकार्‍यांना देणे माझे कर्तव्य आहे. याबाबत सहकार्‍यांशी चर्चा करू आणि पक्ष म्हणून निर्णय घेऊ,’ असे पवार म्हणाले. दरम्यान, मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणार्‍या रेणू शर्माने मलाही अडकविण्याचा प्रयत्न केला होता, असे भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनीष धुरी यांनी म्हटले आहे. या प्रकरणी हेगडे यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply