Breaking News

प्रभू श्रीराम सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान -जयप्रभा विजय महाराज

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व निधी समर्पण संपर्क अभियानाच्या खोपोली कार्यालयाला जैन मुनींची भेट

खोपोली : प्रतिनिधी

प्रभू श्रीराम यांनी मर्यादा सोडली नाही, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बोलले जाते. आपल्या शत्रूबद्दलही ते नेहमी आदर ठेवत. चांगला व्यवहार त्याचप्रमाणे प्रजेवर  नितांत प्रेम यामुळेच प्रभू श्रीराम सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याचे जैन मुनी जयप्रभा विजय महाराज यांनी खोपोली येथे सांगितले.

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व निधी समर्पण संपर्क अभियानाच्या खोपोली येथील खालापूर तालुका संपर्क कार्यालयाला विजय महाराज यांनी भेट दिली. त्या वेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. मंदिर संस्कारांची व संस्कृतीची ओळख आहे. त्यामुळेच मंदिर निर्माण अनिर्वाय आहे. त्यासाठी सर्वांनी झोकून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

समाजात पैशांसाठी वाढत असलेला लोभ व त्यातून होणार्‍या वाईट रूढी हे समाजाला तसेच देशाला घातक आहे. नेहमी चारित्र्यसंपन्न जीवन जगण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मनःशांती मिळेल, असे विजय महाराज यांनी सांगितले.

प्रारंभी खोपोली शहरातील जैन मंदिरापासून विजय महाराज यांची छोट्या पदयात्रेने सुरुवात झाली. त्यांचे स्वागत तालुका अभियान प्रमुख हभप केशवबुवा बुरूमकर यांनी केले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक राकेश पाठक, कार्यवाह अविनाश मोरे, विहिंप जिल्हा मंत्री रमेश मोगरे, भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, संघाचे जिल्हा कार्यकर्ते रोहित कुलकर्णी, शहर अभियान कार्यालय व्यवस्थापक विजय गोखले, पांडे त्याप्रमाणे उद्योजक राजू जैन, नगरसेवक किशोर पानसरे, रवींद्र जैन यांच्यासह शहरातील जैन बांधव व मान्यवर तसेच संघ परिवारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी जैन मुनी विजय महाराज यांच्या उपस्थितीत नगरसेवक किशोर पानसरे, भाजप शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल व कार्यकर्ते रवींद्र जैन तसेच जैन संघटनांच्या वतीने महाराजांकडे निधी सुपूर्द करण्यात आला. विजय महाराज यांनी तो निधी तालुका अभियान प्रमुख हभप केशवबुवा बुरूमकर यांना दिला.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply