Breaking News

नेरळमध्ये गानसम्राज्ञी स्व. लतादिदींना संगीतमय श्रद्धांजली

कर्जत ः बातमीदार

गानसम्राज्ञी, भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना नेरळमध्ये श्री गजानन सामवेदिका संगीत क्लास यांच्या माध्यमातून संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लतादिदींची अजरामर गाणी या वेळी सादर केली.

श्री गजानन सामवेदिका संगीत प्रशिक्षण केंद्राच्या वतीने स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून लतादिदींनी गायलेल्या व स्वरबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री गजानन सामवेदिकेचे अक्षय जोशी, अमेय जोशी, बल्लाळ जोशी, अजय गायकवाड,कर्जत तालुका सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरुण धारप यांनी स्व. लतादिदींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले,. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुरुवातीला थोडे शास्त्रीय संगीत गायले. त्यानंतर गगनसदन तेजोमय, मोगरा फुलला, मायभवानी तुझे लेकरु, नको देवराया अंत आता पाहू,  सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, लगजा गले, अजीब दास्ता है ये, ज्योती कलश झलके, ऐरणीच्या देवा तुला, मधु मागसी माझ्या सख्या परी, मायेन न मायेन ने रूप तेरी, आओ तुम्हे चांदपे ले जाये, नैनो मे बदरा छाए, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, शुर आम्ही सरदार आदी विविध प्रकारची गीते ज्येष्ठ विद्यार्थी प्रज्ञा  सोमाणी, सीमा पटवर्धन, संध्या भडसावळे, भक्ती जोशी, सुयोग चारी तसेच आरोही जोशी, वैष्णवी चारी, सिद्धश राणे, गार्गी सदावर्ते, अदिती चोचे, रूचा सुकाळे, नेहा जाधव, निकिता बाकळे, रूचा कुलकर्णी,आर्जवी वैद्य इ. विद्यार्थ्यांनी आपल्या परीने उत्तम सादर केली.

गायक-गायकांना पंकज जाधव, नंदा सावंत, आणि अमेय जोशी उत्तम साथ संगत केली. अक्षय जोशी यांनी कार्यक्रमाचे संगीत संयोजन व प्रत्येक गीताशी निगडीत लतादिदींच्या आठवणी सांगत निवेदनही केले. कार्यक्रमास संगीतप्रेमींची भरपूर दाद मिळाली. या क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या पालकांसह विनायक रानडे, शिरीष चाफेकर, विवेक भडसावळे, गजानन म्हात्रे, श्रीराम सोमाणी डॉ. आशिष कर्वे, डॉ. अश्विनी कर्वे, डॉ. आदिती कर्वे, आनंद काळे, आसावरी काळे, स्नेहल साठे जयश्री रानडे, अथर्व कर्वे, श्रेयस सोमाणी, धृव गोमारे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयोस्तुते या अजरामर गीताबद्दल अक्षय जोशी यांनी एक विशेष आठवण सांगितली व सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र गायलेल्या याच समूहगानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून १८ शाळांना डिजिटल साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक शाळेची गरज ओळखून त्या ठिकाणी विकास निधीतून आवश्यक …

Leave a Reply