पनवेल : वार्ताहर
अयोध्येत उभारण्यात येणार्या प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माणासाठी राम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान देशभर राबविण्यात येत आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य श्रीराम मंदिर साकारण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून खारघर येथील राम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 15) कोकण म्हाडा मा. सभापती तथा भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
खारघर सेक्टर 19 च्या वस्ती कार्यालयाच्या उद्घाटना वेळी जिल्हा निधी अभियान प्रमुख आनंद जोशी, इस्कॉन मंदिराचे संत परमदास गुरुजी, जगदीश मुकुंददास गुरुजी, विश्व हिंदू परिषद खारघर नगर अभियान प्रमुख विजय कनवर तसेच सेक्टर 19 हे वस्ती प्रमुख भावेश अंकोली यांची उपस्थिती लाभली.
कार्यालयात वैदिक हवन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी मान्यवरांनी राम श्रीराम जन्मभूमी निर्माण संघर्षाची माहिती दिली व जनसमर्पण निधी संकलन अभियान चालविण्या मागचे उद्देश यावर मार्गदर्शन केले.
या वेळी अनेक रामभक्त कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अरविंद थापलु, शिवम सिंग, रंजन शर्मा, भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील तसेच भाजपचे कार्यकर्ते समीर कदम, किरण पाटील, बिना गोगरी, दिलीप जाधव, गुरू ठाकूर, जयेश गोगरी, पत्रकार आप्पासाहेब मगर, अंजू आर्या, स्मिता श्रीवास्तव, अल्पना डे, नीता गोगरी, प्राची देशपांडे, समता मोदी, खारघर शहरातील अनेक रामभक्त स्वयंसेवक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बिना गोगरी यांनी केले.