मुंबई : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने साम-दाम-दंड-भेद अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला, मात्र तरीदेखील भाजपची विजयी घोडदौड ते रोखू शकले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. 18) सकाळपासून समोर येऊ लागले व यामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपने विजय प्राप्त केल्याचे दिसून आले. या निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याविरोधात भाजप अशीच बहुतांश ठिकाणी लढत झाली. विविध ठिकाणी उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती, परंतु हाती येत असलेल्या आकडेवारीनुसार भाजपने अनेक ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …