Breaking News

बेघर झालेल्या 14 कुटुंबांना मिळणार पक्की घरे

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली कामाची पाहणी

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिकेकडून पनवेलमधील झोपडपट्ट्यांवर कारवाई करून तेथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते. या कारवाईमध्ये राहती घरेही पाडली गेली. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 14 कुटुंबांना नवनाथनगर येथे पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत. या कामाची सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 10) पाहणी केली.

पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल एसटी स्टॅण्डजवळ असलेल्या झोपडपट्ट्यांवर काही दिवसांपूर्वी कारवाई करून येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते. या कारवाईत झोपडपट्टीधारकांची राहती घरेही पाडण्यात आली असून, त्यांच्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत.त्या अनुषंगाने नवनाथनगर येथे 14 कुटुंबांसाठी घरे बांधण्यात येत असून, या घरांच्या कामाची पाहणी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून लवकरात लवकर उत्कृष्ट दर्जाचे काम करून या झोपडपट्टीधारकांना त्यांच्या घराचा ताबा देण्याचे निर्देश दिले. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका सुशीला घरत, रावसाहेब खरात, राहुल वाहुळकर, संतोष कीर्तिकर, अशोक कांबळे, विजय झिरे, धनश्री वाघमारे यांसह मान्यवर उपस्थित होते. या कामासंदर्भात नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी अधिक माहिती दिली आहे.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply