Breaking News

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

मुंबई ः प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्याने देशात घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात 62.50 रुपयांनी कपात झाली आहे. वर्षाला 12 अनुदानित सिलिंडर्सचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना हा विनाअनुदानित गॅस घ्यावा लागतो, मात्र ज्या ग्राहकांचा हा कोटा शिल्लक आहे अशांनाही याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या नव्या दरांमुळे 14.2 किलोच्या अनुदानित गॅसचा दर आता 574.50 रुपये इतका असणार आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच हा नवा दर लागू झाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात सरकारकडून विनाअनुदानित घरगुती गॅसच्या दरात 100.50 रुपयांनी मोठी कपात करण्यात केली होती. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी 62.50 रुपयांची कपात झाल्याने सुमारे एका महिन्यात गॅसचे दर हे 163 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे हा गृहिणींसाठी मोठा दिलासा आहे. दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या नव्या दराप्रमाणे प्रत्येक सिलिंडरसाठी ग्राहकाला आपल्या बँक खात्यात 142.65 रुपयांचे अनुदान मिळेल.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply