हैदराबाद : वृत्तसंस्था
अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा बिग्रेडने ऑस्ट्रेलियात कमाल केली. यामध्ये मोहम्मद सिराजनेही आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर सिराजने बीएमडब्ल्यू गाडी खरेदी केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दौर्याला सुरुवात झाल्यानंतर मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियातच थांबून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम सिराजने केला.
सिराजच्या वडिलांनी रिक्षा चालवून मुलाच्या क्रिकेटपटू होण्याच्या स्वप्नांना बळ दिले होते. आता सिराजने घरासमोर बीएमडब्ल्यू गाडी उभा केली आहे, मात्र वडील सोबत नाहीत.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …